Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग वापरा या ७ सोप्या टिप्स; केस होतील मऊ, मुलायम आणि चमकदार

Shruti Vilas Kadam

केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडा

केस कोरडे आणि फ्रिझी होत असतील, तर केसांमधील नैसर्गिक ओलावा यावा यासाठी सॉफ्ट शॅम्पू वापरा. केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडल्यास केस स्वच्छ राहण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Hair Care | Saam Tv

प्रत्येक वेळी कंडिशनर लावा

केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करा. कंडिशनर लावल्याने केस मऊ होण्यास, गुंता कमी होण्यास मदत होते.

Hair Care | Saam Tv

केस टॉवेलने जोरात घासू नका

ओले केस नाजूक असतात. त्यामुळे केस सुकवताना टॉवेलने जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने पाणी टिपून घ्या. मायक्रोफायबर टॉवेल किंवा मऊ सुती टी-शर्ट वापर करावा.

Hair Care | Saam Tv

केसांमधील ओलावा टिकवून ठेवा

केस धुतल्यानंतर लीव्ह-इन कंडिशनर किंवा सीरम वापरू शकता. यामुळे केस मऊ राहण्यास, उडणारे बारीक केस नीट सेट होण्यास मदत होते. त्यामुळेन केस कमी फ्रिझी होतात.

Hair Care | Saam Tv

हीट स्टायलिंगचा वापर कमी करा

स्ट्रेटनर, कर्लर आणि हेअर ड्रायरचा अतिवापर केल्याने केस कोरडे आणि खराब होऊ शकतात. केस नॅचरली सुकू द्या. हेअर ड्रायर वापरताना हीट प्रोटेक्टर नक्की वापरा.

Hair Care | Saam tv

आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरा

केस कोरडे आणि राठ असतील, तर केसांच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझिंग हेअर मास्क वापरा. यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. पण कोणताही मास्क १५ मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नका.

Hair Care | Saam tv

झोपताना केसांची योग्य काळजी घ्या

झोपताना सॅटिन किंवा सिल्कचे उशीचे कव्हर वापरा. केस खूप घट्ट बांधू नका आणि केसांचा गुंता कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी हलक्या हाताने केस विंचरा.

Hair care | Saam Tv

Weight Loss Food: वजन कमी करण्यासाठी काय खावं, काय टाळावं? आहारतज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचा

Weight Loss Food | Saam Tv
येथे क्लिक करा