Shruti Vilas Kadam
शेव्हिंग करण्याआधी फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ, घाम आणि मेकअप निघून जाईल. शेव्हिंग करताना त्वचा थोडी ओलसर ठेवा.
चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी फेशियल रेझर वापरा. रेझर स्वच्छ असावा आणि त्याचे ब्लेड चांगले असावे. दुसऱ्या व्यक्तीचा रेझर वापरू नका. ब्लेड खराब झाल्यास ते बदला.
चेहऱ्यावरील केस काढताना रेझर हलक्या हाताने फिरवा. त्वचेवर जास्त दाब देऊ नका. एकाच जागेवर रेझर फिरवल्यास त्वचेवर लालसरपणा, जळजळ किंवा कट्स होऊ शकतात.
शेव्हिंग करण्यापूर्वी चेहऱ्यावर शेव्हिंग जेल लावा. यामुळे रेझर सहज फिरतो आणि त्वचेला घर्षण कमी होते. चेहऱ्यावर कोरडा रेझर फिरवू नका.
शेव्हिंग केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर स्क्रब करू नका. यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते.
शेव्हिंग झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. संवेदनशील त्वचा असल्यास सुगंध नसलेले मॉइश्चरायझर वापरा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.