Shruti Vilas Kadam
रोज सकाळ-संध्याकाळ चेहरा स्वच्छ करून टोनर वापरा, यामुळे त्वचेतील घाण दूर होते आणि त्वचा ताजीतवानी दिसते.
आठवड्यातून दोनदा स्क्रब वापरून मृत त्वचा काढून टाका. यामुळे चेहरा उजळतो आणि ब्रेकआउट्स टाळले जातात.
काकडी, टरबूज, बेसन, हळद, दही इत्यादी नैसर्गिक घटकांपासून फेसपॅक लावा. हे त्वचेला पोषण देतात.
चेहऱ्याला हलक्या हाताने तेल किंवा जेलने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि नितळ त्वचा मिळते.
भरपूर पाणी प्या, फळं-भाज्या खा, आणि तळलेले, जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
रोज ७–८ तासांची झोप आवश्यक आहे. झोपेचा अभाव डार्क सर्कल्स व थकवा निर्माण करतो.
लग्नापूर्वीचा तणाव टाळण्यासाठी ध्यान, प्राणायाम, किंवा हलका व्यायाम करा. मन शांत राहिलं की त्वचाही तेजस्वी राहते.