ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्यूटी प्रोडक्टस सोबत घरगुती उपायांमध्ये कच्या दूधाचा वापर खूप केला जातो. कच्या दूधाला स्किन क्लिंझर म्हणून वापरले जाते.
कच्चे दूध त्वचा स्वच्छ करते. त्वचेचे छिद्र उघडते आणि ओलावा टिकवून ठेवते.
दूधाचे फायदे आहेतच, पण त्याचे नुकसानही आहेत. काही लोकांनी कच्चे दूध चेहऱ्याला लावू नये. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
आजकाल कच्च्या दुधात अनेकदा भेसळ केली जाते. त्यामुळे सेंसिटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी ते चेहऱ्यावर वापरणे टाळावे.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर कच्चे दूध वापरणे टाळावे. यामुळे अॅलर्जी आणखी वाढू शकते.
तुमची स्किन ऑयली असेल तर कच्चे दूध चेहऱ्यावर लावणे टाळावे. दुधात चिकटपणा असल्यामुळे ऑयली स्किनवरील तेलकटपणा आणखीन वाढतो.
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स जास्त असतील तर, कच्चे दूध चेहऱ्यावर अजिबात लावू नये. लावल्यास अधिक नुकसान होईल आणि पिंपल्ससुध्दा वाढतील.
कच्च्या दुधात साल्मोनेलासारखे पदार्थ असतात, ज्यामुळे स्किनचे इंफेक्शन होऊ शकते. म्हणून, कच्चे दूध वापरण्यापूर्वी एकदा तपासून पाहावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.