Shruti Vilas Kadam
हे सीरम बनवण्यासाठी एक ग्लास पाणी, एक चमचा जवसाच्या बिया आणि मूठभर अपराजिता फुलं घ्या.
एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात जवसाच्या बिया आणि अपराजिता फुलं टाका. मंद आचेवर साधारण ७-८ मिनिटं उकळू द्या.
जवसाच्या बिया उकळल्यानंतर पाण्याला थोडा चिकट आणि जेलसारखा पोत येईल. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर स्वच्छ गाळणीने गाळून घ्या. तयार झालेले सीरम स्वच्छ, हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
जवसाच्या बियांपासून तयार होणारा जेल त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड दिसू शकते.
अपराजिता फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे हे सीरम त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि त्वचेला फ्रेश लुक मिळण्यास मदत होऊ शकते.
सीरम चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा. घरगुती सीरम असल्याने ते जास्त काळ साठवून ठेवू नका.