Glasses Cleaning Tips: चष्म्याचे ग्लास वारंवार खराब आणि धुरकट दिसतात? 'या' सोप्या ट्रिक्सने लेन्स दिसतील नव्यासारखे!

Shruti Vilas Kadam

मायक्रोफायबर कापड वापरा

लेन्स स्वच्छ करण्यासाठी मऊ मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. यामुळे धूळ आणि बोटांचे ठसे सहज पुसता येतात.

Eye Glasses Clean Tips | google

लेन्सवर थेट पाणी शिंपडू नका

चष्मा स्वच्छ करताना योग्य पद्धतीचा लेन्स क्लीनर वापरणे चांगले. त्यामुळे लेन्सवर डाग राहण्याची शक्यता कमी होते.

How to clean eye glasses

कपडे किंवा टिश्यूने लेन्स पुसणे टाळा

शर्ट, साडी किंवा इतर कपड्यांनी लेन्स पुसल्यास त्यावर बारीक ओरखडे पडू शकतात. टिश्यू पेपरचाही वारंवार वापर टाळावा.

Glasses Cleaning Tips | GOOGLE

लेन्सला हात लावू नका

चष्मा लावताना किंवा काढताना फ्रेमच्या कडांना हात लावा. लेन्सला हात लागल्यास त्यावर तेलकट डाग आणि बोटांचे ठसे पडतात.

Glasses Cleaning Tips

चष्मा योग्य ठिकाणी ठेवा

चष्मा वापरत नसताना तो केस किंवा कव्हरमध्ये ठेवावा. त्यामुळे धूळ, ओरखडे आणि इतर नुकसानापासून लेन्सचे संरक्षण होण्यास मदत होते.

Glasses Cleaning Tips

गरम पाणी वापरणे टाळा

चष्मा स्वच्छ करण्यासाठी अतिशय गरम पाणी वापरू नका. त्यामुळे काही लेन्सच्या कोटिंगवर परिणाम होऊ शकतो.

Glasses Cleaning Tips

नियमित स्वच्छता करा

लेन्सवर धूळ किंवा डाग साचण्याची वाट पाहण्यापेक्षा चष्मा नियमितपणे स्वच्छ करा. योग्य पद्धतीने साफसफाई केल्यास लेन्स अधिक स्वच्छ आणि स्पष्ट दिसण्यास मदत होते.

Glasses Cleaning Tips | GOOGLE

Mangalsutra Unique Designs: साडी असो वा वेस्टर्न लूक; पातळ चेनचे ७ मंगलसूत्र डिझाइन्स दिसतील नेहमीच स्टायलिश

Mangalsutra Unique Designs | Saam Tv
येथे क्लिक करा