Shruti Vilas Kadam
अनेकजण चेहऱ्यावर खूप कमी प्रमाणात सनस्क्रीन लावतात. योग्य संरक्षणासाठी पुरेशा प्रमाणात सनस्क्रीन लावणे आवश्यक असते, अन्यथा UV किरणांचा प्रभाव कमी होत नाही.
तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीनचा SPF कमी असल्यास त्वचेला पुरेसे संरक्षण मिळत नाही. रोजच्या वापरासाठी किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक SPF असलेले सनस्क्रीन निवडावे.
एकदा सकाळी सनस्क्रीन लावून दिवसभर त्याचा परिणाम टिकत नाही. विशेषतः उन्हात राहिल्यास दर 2-3 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणे गरजेचे असते.
जास्त घाम येणे किंवा त्वचा तेलकट असणे यामुळे सनस्क्रीनचा प्रभाव कमी होऊ शकतो. अशावेळी वॉटर-रेझिस्टंट सनस्क्रीनचा वापर फायदेशीर ठरतो.
काही सनस्क्रीन फक्त UVB किरणांपासून संरक्षण देतात. UVA किरणांमुळेही टॅनिंग होते, त्यामुळे ‘ब्रॉड-स्पेक्ट्रम’ सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे.
सनस्क्रीन पूर्णपणे सूर्यकिरणे रोखत नाही. दीर्घकाळ उन्हात राहिल्यास त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. त्यामुळे टोपी, छत्री किंवा सनग्लासेसचा वापरही करावा.
मृत त्वचेच्या पेशी, प्रदूषण आणि त्वचेतील ओलाव्याचा अभाव यामुळे टॅनिंग अधिक स्पष्ट दिसू शकते. नियमित क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि एक्सफोलिएशन आवश्यक आहे.