Shruti Vilas Kadam
बदाममध्ये असलेल्या व्हिटॅमिन E मुळे त्वचेचे नुकसान भरून निघते. हे त्वचेला मॉइस्चर देते आणि सुरकुत्या कमी दिसण्यास मदत करते.
ब्लूबेरीज त्वचेला फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. त्यामुळे स्किन एजिंगची प्रक्रिया मंदावते आणि त्वचा हेल्दी चमकदार राहते.
पालकामध्ये व्हिटॅमिन A, C, E आणि K मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेला पोषण मिळते. हे स्किन टाइट ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स त्वचेतील सूज कमी करतात. त्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि तरुण दिसते.
टोमॅटोतील लाइकोपीन हा नॅचरल सनप्रोटेक्टर आहे. हे त्वचेला सूर्यामुळे होणाऱ्या एजिंगपासून वाचवते आणि रिंकल्स कमी करण्यास सहाय्य करते.
फक्त आहार पुरेसा नसतो. पुरेसे पाणी, नियमित व्यायाम, सनस्क्रीनचा वापर आणि धूम्रपान टाळणे हे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
एजिंगची लक्षणे जास्त दिसत असल्यास किंवा त्वचेचे प्रश्न वाढत असल्यास स्किन एक्स्पर्ट किंवा डायटिशियनचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.