Shruti Vilas Kadam
एक चमचा बेसन, चिमूटभर तुरटी पावडर, थोडी कडूलिंब पावडर आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट तयार करा.
तुरटी आणि कडूलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे त्वचेवरील घाण, तेलकटपणा आणि बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात.
कडूलिंब त्वचेतील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे पिंपल्स आणि त्यांचे डाग कमी होण्यास फायदा होतो.
बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतं. त्यामुळे चेहरा फ्रेश आणि स्वच्छ दिसतो.
गुलाबपाणी त्वचेला थंडावा देतं आणि त्वचा हायड्रेट ठेवतं. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते.
हा फेस पॅक नियमित वापरल्यास उन्हामुळे झालेली टॅनिंग कमी होण्यास मदत मिळू शकते.
हा फेस पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.