Saam Tv
तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही घटकांमुळे टाचा मऊ आणि मुलायम होऊ शकतात. यामुळे फटलेल्या टाचांसाठी ५ सोपे घरगुती उपाय
२ पिकलेली केळी चांगली मॅश करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांवर आणि पायांवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या
एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात १ कप मध मिसळा. सुमारे २० मिनिटे पाय या पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर पाय पुसून मॉइश्चरायझर लावा.
पाय स्वच्छ धुवून वाळवून घ्या. २ चमचे तेल टाचांवर चांगले लावा आणि कॉटनचे सॉक्स घालून रात्रभर झोपा.
पायाच्या टाचांना १५ मिनिटे व्हॅसलीन लावून पाय कोमट पाण्यात ठेवा आणि वाळवा.
१ चमचा व्हॅसलीनमध्ये ४-५ थेंब लिंबाचा रस मिसळून टाचांवर लावा आणि मोजे घालून रात्रभर ठेवा.
(टीप: टाचांवर जखम किंवा जळजळ असल्यास लिंबू वापरणे टाळा)
२ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचा मध आणि ५-६ थेंब सिरका (व्हिनेगर) एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. १० मिनिटे कोमट पाण्यात पाय ठेवल्यानंतर या पेस्टने टाचांवर हलक्या हाताने स्क्रब करा. आठवड्यातून २-३ वेळा हा प्रयोग करू शकता.
आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर चांगले मॉइश्चरायझर किंवा पेट्रोलियम जेली लावा.
आठवड्यातून २ वेळा कोमट पाण्यात पाय ठेवून हलक्या हाताने मृत त्वचा काढून टाका.
मोजे घालून झोपल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
NEXT : ऑफिसमध्ये स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी टाळाव्यात 'या' ५ चुका