Saam Tv
जेन जी तरुणांना स्टायलिश दिसण्यासोबतच आरामदायी कपडे घालायला आवडतात.
कधीकधी कपड्यांशी संबंधित छोट्या-छोट्या चुका तुमचा पूर्ण लूक बिघडवू शकतात. ऑफिस लूकदरम्यान जेन जी तरुणांनी टाळल्या पाहिजेत अशा ५ चुका कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया
सैल म्हणजेच बॅगी कपडे फॅशनमध्ये आहेत, परंतु खूप जास्त सैल किंवा जास्त घट्ट कपडे प्रत्येक प्रसंगी चांगले दिसत नाहीत. फक्त कपडे योग्य फिटिंगचे आणि दिवसभर घालण्यासाठी आरामदायी असावेत याची काळजी घ्या.
स्वच्छ कपडे, डाग नसलेला शर्ट आणि व्यवस्थित इस्त्री केलेली पँट देखील तुमचा लूक अधिक खुलवू शकते. ऑफिसमध्ये कपडे नीट आणि स्वच्छ दिसणे खूप महत्त्वाचे असते.
प्रत्येक ऑफिसचे वातावरण आणि संस्कृती वेगवेगळी असते. काही ठिकाणी जीन्स आणि टी-शर्ट चालतात, तर काही ठिकाणी फॉर्मल कपडे घालणे अनिवार्य असते. त्यामुळे नवीन फॅशन फॉलो करण्यापूर्वी तुमच्या ऑफिसचा ड्रेस कोड काय आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ईयररिंग्स (कुकड्या), नेकलेस आणि ब्रेसलेट तुमचा लूक खास बनवू शकतात. परंतु, एकाच वेळी अनेक अॅक्सेसरीज वापरल्याने लूक खूप भरगच्च आणि भडक वाटू लागतो. ऑफिससाठी एक किंवा दोन साध्या अॅक्सेसरीज निवडणे हा उत्तम पर्याय ठरतो.
कपड्यांसोबतच तुमचे फुटवेअर देखील संपूर्ण लूकचा एक महत्त्वाचा भाग असतात. घाणेरडे शूज किंवा ऑफिसच्या वातावरणाला न शोभणारे फुटवेअर तुमचा संपूर्ण लूक बिघडवू शकतात.
ऑफिसमध्ये चांगले दिसण्यासाठी नवीन फॅशन ट्रेंड फॉलो करणे किंवा महागडे कपडे खरेदी करणे गरजेचे नाही. स्वच्छ कपडे घालणे, योग्य फिटिंग निवडणे पुरेसे आहे.
NEXT : वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल