Health Checkup30s: वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल

Saam Tv

रक्तदाब चाचणी

नियमित रक्तदाब तपासल्याने हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका टाळता येतो. वर्षातून किमान एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब तपासावा.

Blood Pressure Test | pinterest

रक्तातील साखरेची चाचणी

फास्टिंग ब्लड शुगर आणि गेल्या ३ महिन्यांची सरासरी दाखवणारी 'HbA1c' चाचणी केल्याने प्री-डायबिटीज लवकर लक्षात येते. योग्य आहार आणि व्यायामाने मधुमेह सुरुवातीलाच रोखता येतो.

Blood Sugar | pinterest

लिपिड प्रोफाइल चाचणी

ही चाचणी रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉल, HDL चांगले कोलेस्ट्रॉल, LDL वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी स्पष्ट करते.

Lipid Profile Test | pinterest

थायरॉईड प्रोफाईल चाचणी

महिलांमध्ये तिशीनंतर थायरॉईडची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. वजन वाढणे/ कमी होणे, सतत थकवा जाणवणे, केस गळणे आणि मनःस्थितीत बदल होणे. थायरॉईडची पातळी वेळेत ओळखल्यास योग्य औषधोपचाराने शरीराचे चयापचय नियंत्रणात ठेवता येते.

Thyroid Function Test | pinterest

व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ चाचणी

व्हिटॅमिन डी मुळे हाडे मजबूत राहतात, तर व्हिटॅमिन बी १२ मज्जासंस्था आणि रक्ताभिसरणासाठी आवश्यक असते. थकवा आणि सांधेदुखीपासून वाचण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे.

Vitamin D & B12 | pinterest

लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट

प्रक्रिया केलेले अन्न ,औषधांचा वापर किंवा मद्यपानामुळे यकृत किंवा मूत्रपिंडावर पडणारा ताण या चाचण्यांद्वारे वेळेत समजतो.

LFT & KFT | pinterest

संपूर्ण रक्त तपासणी

अ‍ॅनिमिया , संसर्ग किंवा प्रतिकारशक्तीशी संबंधित समस्या यामुळे स्पष्ट होतात.

Complete Blood Count | pinterest

कर्करोग पूर्व तपासणी

महिलांसाठी पॅप स्मीअर आणि स्तन तपासणीद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा व स्तनांचा कर्करोग वेळेत ओळखता येतो. तसेच, पुरुषांसाठी कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक चाचण्या कराव्यात.

Cancer Screenings | pinterest

NEXT : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Egg | AI PHOTO
येथे क्लिक करा