Skin Care: चेहरा दिसेल एकदम हायड्रेटेड आणि ग्लोइंग! फक्त ३ गोष्टी वापरून बनवा हे जादूई टोनर

Shruti Vilas Kadam

राइस टोनरसाठी लागणारे साहित्य

यासाठी ३-४ चमचे जाड तांदूळ, ४-५ लवंगा आणि काही थेंब शुद्ध, सुगंधरहित ग्लिसरीन लागेल.

Skin Care | Saam Tv

तांदूळ स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम तांदूळ दोन वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर ते साधारण एक तास पाण्यात भिजत ठेवा.

Face care | Saam tv

तांदळाचे पाणी गाळून घ्या

तांदूळ भिजवल्यानंतर पाणी गाळून स्वच्छ बाटलीत भरावे. यामध्ये ४-५ लवंगा टाकून बाटली हलवावी.

Skin Care | Pintrest

काही तास थंड ठेवा

लवंगा घातलेली बाटली दोन ते तीन तास फ्रीजरमध्ये ठेवावी. त्यानंतर त्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळावेत.

Skin Care | Saam Tv

त्वचेच्या प्रकारानुसार ग्लिसरीन वापरा

त्वचा तेलकट असल्यास ग्लिसरीन कमी प्रमाणात वापरावे, तर कोरड्या त्वचेसाठी त्याचे प्रमाण थोडे वाढवता येते.

Skin Care | Saam Tv

टोनर लावण्याची योग्य पद्धत

चेहरा सौम्य क्लींजरने स्वच्छ केल्यानंतर हा टोनर स्प्रे बाटली किंवा कॉटन पॅडच्या मदतीने लावता येतो. त्यानंतर मॉइश्चरायझर, सीरम आणि सनस्क्रीन लावा.

Skin Care | Saam TV

त्वचेला मिळू शकतात ‘हे’ फायदे

राइस टोनरमुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड वाटण्यास मदत होऊ शकते. तांदळातील घटकांमुळे त्वचा अधिक ब्राइट आणि ग्लोइंग दिसू शकते. संवेदनशील किंवा मुरुमांची प्रवृत्ती असलेल्या त्वचेवर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

Skin Care | Pintrest

Bread Pakoda Recipe: चहासोबत खाण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत टेस्टी ब्रेड पकोडा; वाचा रेसिपी

Bread Pakoda Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा