Shruti Vilas Kadam
एका चमचा मधामध्ये 2 ते 3 केशराच्या काड्या मिसळा. 10 मिनिटांनंतर सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.
केशर आणि मधामधील अँटीऑक्सिडंट्स शरीराची इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात आणि संसर्गापासून संरक्षण देतात.
या मिश्रणामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसून येतो.
मध आणि केशर शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे कमजोरी आणि थकवा कमी होण्यास मदत मिळते.
हे मिश्रण पचन सुधारण्यास मदत करते. अपचन, गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या कमी होऊ शकतात.
केशर मन शांत ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे तणाव कमी होऊन मूड चांगला राहतो.
केशर आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि फ्रेश दिसू शकते.