Skin care: तुमच्या चेहऱ्यावरही वारंवार पिंपल्स का येतात? मग जाणून घ्या काय आहे नेमकं कारण?

Shruti Vilas Kadam

हार्मोन्समधील बदल

किशोरवय, मासिक पाळी, गर्भधारणा किंवा हार्मोनल असंतुलनामुळे त्वचेतील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे पिंपल्स येण्याचा धोका वाढतो.

Skin Care | Saam Tv

त्वचेत अतिरिक्त तेल (Sebum) तयार होणे

तेलकट त्वचेवर अतिरिक्त सेबम आणि मृत त्वचेच्या पेशी एकत्र आल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात. त्यामुळे मुरुम निर्माण होऊ शकतात.

Face care | Saam tv

चुकीचा आहार

अतिप्रमाणात साखर, जंक फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने काही लोकांमध्ये पिंपल्सची समस्या वाढू शकते.

Skin Care | Saam Tv

तणाव आणि अपुरी झोप

सततचा तणाव आणि कमी झोप यामुळे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढून मुरुम येऊ शकतात.

Skin Care | Pintrest

चेहरा वारंवार स्पर्श करणे

घाणेरड्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श केल्याने जंतू आणि धूळ त्वचेवर पोहोचते. त्यामुळे छिद्रे बंद होऊन पिंपल्स होण्याची शक्यता वाढते.

Skin Care | Pintrest

त्वचेला न सूट होणारे मेकअप वापरणे

त्वचेच्या प्रकारानुसार योग्य स्किनकेअर किंवा मेकअप उत्पादने न वापरल्यास छिद्रे बंद होऊ शकतात आणि मुरुम वाढू शकतात.

Skin care | Saam tv

चेहरा व्यवस्थित स्वच्छ न ठेवणे

दिवसभरातील धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे त्वचेवर घाण साचते. नियमित आणि सौम्य क्लेंझिंग न केल्यास पिंपल्सची समस्या वाढू शकते.

Skin Care | Pintrest

Shruti Marathe: नथ, नऊवारी आणि दिलखेचक अदा; श्रुती मराठेचा पारंपरिक सौंदर्यावर चाहते फिदा

Shruti Marathe | Saam Tv
येथे क्लिक करा