Shruti Vilas Kadam
अभिनेत्री श्रुती मराठेने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान करत पारंपरिक मराठमोळा लूक साकारला आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
नऊवारी साडीसोबत तिने पारंपरिक नथ, गळ्यातील दागिने, बांगड्या आणि इतर मराठमोळ्या दागिन्यांचा साज चढवला आहे. त्यामुळे तिचा लूक अधिक उठून दिसत आहे.
हलक्या मेकअपसह सुंदर हेअरस्टाईल आणि आत्मविश्वासपूर्ण पोझमुळे श्रुतीचा पारंपरिक लूक अधिक मोहक दिसत आहे.
या फोटोशूटला श्रुतीने मराठी 'आज रंगही माझ्यासाठी खुलले' असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
श्रुतीच्या या फोटोंवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजींसह भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या मराठमोळ्या सौंदर्याचे कौतुक केले.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले असून, पारंपरिक फॅशन आवडणाऱ्यांकडून त्यांना मोठी पसंती मिळत आहे.
लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नऊवारी साडी कशी स्टाईल करावी, यासाठी श्रुती मराठेचा हा लूक अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.