ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फेस पावडर अनेक वर्षांपासून ब्यूटी प्रोडक्टचा एक भाग आहे. जर तुम्हाला कुठेतरी जाण्याची घाई असेल, तर तुम्ही पटकन फेस पावडर लावून तयार होता.
फेस पावडर खूप हलकी असल्यामुळे कोणत्याही त्वचेच्या रंगात सहजपणे मिसळून जाते.
पण जर तुम्ही दररोज फेस पावडर वापरत असाल, तर थोडे सावध रहा. दररोज फेस पावडर लावण्याचे काही दुष्परिणाम आहेत ते जाणून घ्या.
फेस पावडर कोरडी असते आणि त्वचेतील ऑईल शोषून घेते. त्यामुळे, सततच्या वापरामुळे त्वचेतील नैसर्गिक ऑईल कमी होते.
दररोज फेस पावडर वापरल्याने त्वचा कोरडी पडू शकते. त्वचेच्या अनेक भागांवर पांढरे डाग दिसू लागतात.
संशोधनानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या स्थानिक फेस पावडरमध्ये एस्बेस्टोस नावाचे रसायन असते, ज्यामुळे त्वचेच्या कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.
चेहऱ्यावर जास्त पावडर वापरल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. यामुळे त्वचेच्या ॲलर्जीचा धोकाही वाढतो.
नेहमी चांगली फेस पावडर खरेदी करा. तिचा दररोज वापर करणे टाळा. पावडरऐवजी चांगला लोशन किंवा क्रीम वापरा.