Skin Care: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतायत? मग महागड्या ट्रिटमेंटपेक्षा घरीच तयार करा 'हा' फेसपॅच

Shruti Vilas Kadam

पिंपल पॅच कसा तयार कराल?

अॅलोवेरा जेलमध्ये चिमूटभर हळद आणि टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण कॉटन पॅडवर लावून लहान गोल आकारात कापून वापरा.

Skin Care | Saam TV

वापरण्याची योग्य पद्धत

चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर तयार केलेला पॅच पिंपलवर लावा आणि काही तास किंवा रात्रभर तसाच ठेवा.

Skin Care | Saam Tv

कोणते फायदे मिळू शकतात?

पिंपलची लालसरता आणि सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच पिंपलला वारंवार हात लावण्याची सवयही कमी होते.

Skin care | Saam tv

वापरताना घ्या ही काळजी

संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा. कोणतीही जळजळ, खाज किंवा अॅलर्जी जाणवल्यास लगेच वापर थांबवा.

Skin Care | Pintrest

त्वचेची नियमित काळजीही तितकीच महत्त्वाची

पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या, चेहरा स्वच्छ ठेवा आणि योग्य स्किनकेअर रूटीन पाळा. त्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

Skin Care

Monsoon AC Tips: पावसाळ्यात AC किती डिग्रीवर चालवल्यावर बील अर्धे येईल? जाणून घ्या अचूक उत्तर

Monsoon AC Tips | Saam Tv
येथे क्लिक करा