Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असते. त्यामुळे एसी २४ ते २६°C दरम्यान ठेवल्यास खोली आरामदायी राहते आणि वीजेचीही बचत होते.
पावसाळ्यात थंडीपेक्षा दमटपणा जास्त जाणवतो. अशावेळी एसीचा Dry Mode वापरल्यास हवेतली अतिरिक्त आर्द्रता कमी होते आणि वातावरण अधिक सुखद वाटते.
१८ किंवा २० डिग्रीवर एसी चालवल्यास कंप्रेसरवर अधिक ताण येतो. त्यामुळे वीजेचा वापर वाढतो आणि बिलही जास्त येऊ शकते.
एसी सुरू असताना बाहेरची दमट हवा घरात येऊ नये यासाठी दरवाजे व खिडक्या बंद ठेवा. यामुळे कूलिंग अधिक प्रभावी होते.
धूळ साचलेल्या फिल्टरमुळे एसीची कार्यक्षमता कमी होते. फिल्टर वेळोवेळी साफ केल्यास कूलिंग चांगले मिळते आणि विजेची बचत होते.
पावसाळ्यात तापमान कमी असल्यास सतत एसी चालवण्याची गरज नसते. गरजेनुसार वापर केल्यास वीज बिल कमी राहते.
रात्री झोपताना टाइमर किंवा स्लीप मोड सुरू ठेवा. यामुळे एसी ठराविक वेळेनंतर बंद होतो आणि अनावश्यक वीज खर्च टाळता येतो.