Shruti Vilas Kadam
बर्फ पोर्स तात्पुरते घट्ट करतो आणि त्वचेचा रक्तप्रवाह सुधारतो. कापडात बर्फ गुंडाळून चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. यामुळे त्वचा टाइट व फ्रेश दिसते.
गुलाबपाणी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. त्यात चिमूटभर कापूर मिसळून कापसाने चेहऱ्यावर लावा. यामुळे पोर्स स्वच्छ होऊन त्वचा क्लीन दिसते.
अंड्याचा पांढरा भाग पोर्स घट्ट करण्यासाठी प्रभावी आहे. तो चेहऱ्यावर लावून सुकू द्या आणि कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून १–२ वेळा वापर करा.
कोरफड जेल त्वचेला हायड्रेशन देऊन पोर्स कमी दिसण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावल्यास त्वचा स्मूद व सॉफ्ट राहते.
मलई त्वचेला पोषण देते तर लिंबू नैसर्गिक क्लींझर आहे. दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावा व १० मिनिटांनी धुवा. यामुळे पोर्स साफ होतात आणि ग्लो वाढतो.
मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोर्स घट्ट करते. गुलाबपाण्यासोबत पॅक बनवून आठवड्यातून एकदा लावा.
आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्टीम दिल्यास पोर्समधील मळ निघतो. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्यास पोर्स बंद होण्यास मदत होते.