Shruti Vilas Kadam
अॅलोव्हेरा जेल नैसर्गिक असलं तरी काही लोकांच्या त्वचेला ते सूट होत नाही. त्यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येणे अशा समस्या दिसू शकतात.
संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना अॅलोव्हेरा जेलमुळे अॅलर्जी होऊ शकते. चेहऱ्यावर सूज येणे, पुटकुळ्या उठणे किंवा त्वचा खवखवणे अशी लक्षणे दिसतात.
अॅलोव्हेरा जेलचा जास्त वापर केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते. परिणामी त्वचा कोरडी, ताणलेली आणि निस्तेज दिसू शकते.
अॅलोव्हेरामधील काही घटकांमुळे त्वचा सूर्यप्रकाशास अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे सनबर्न किंवा टॅनिंग होण्याची शक्यता वाढते.
रेटिनॉल, केमिकल पील किंवा ॲसिडयुक्त उत्पादने वापरत असाल, तर अॅलोव्हेरा जेल लावल्याने त्वचेवर रिऍक्शन किंवा खवले येऊ शकतात.
अॅलोव्हेरा जेल जखमी किंवा संक्रमित त्वचेवर लावल्यास संसर्ग वाढू शकतो आणि जखम भरायला उशीर होऊ शकतो.
अॅलोव्हेरा जेल पूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट न केल्यास अनपेक्षित प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे आधी हाताच्या आतल्या बाजूला थोडं जेल लावून तपासणं गरजेचं आहे.