Skin Care: इंस्टंट ग्लो आणि मुलायम त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा हा घरगुती टोनर; चेहरा दिसेल चमकदार

Shruti Vilas Kadam

टोनर बनवण्यासाठी साहित्य घ्या

हा टोनर बनवण्यासाठी २ चमचे तांदूळ, ३ ते ४ लवंगा आणि एक कप स्वच्छ पाणी घ्या. शक्यतो स्वच्छ भांडे आणि चांगल्या प्रतीचे साहित्य वापरा.

Skin Care

तांदूळ आणि लवंगा पाण्यात भिजवा

तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर एका भांड्यात तांदूळ, लवंगा आणि पाणी एकत्र करून रात्रभर झाकून ठेवा.

Skin Care

सकाळी पाणी गाळून घ्या

सकाळी हे पाणी स्वच्छ गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. त्यानंतर स्वच्छ बॉटलमध्ये भरा. टोनर तयार करताना स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Skin Care

चेहऱ्यावर स्प्रे कसा करावा?

चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करा. त्यानंतर टोनरचा थोडासा भाग त्वचेच्या छोट्या भागावर लावून पाहा. जळजळ किंवा लालसरपणा जाणवत नसल्यासच वापरण्याचा विचार करा.

Skin Care

त्वचेचा मऊपणा वाढतो

तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी मदत करते यामुळे त्वचा अधिक मऊ होते.

Skin Care | Pintrest

त्वचा स्वच्छता राहते

त्वचेवरील धूळ, घाम दूर करण्यासाठी हा टोनर महत्त्वाचा आहे. मात्र, घरगुती टोनर हा फेसवॉशचा पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून २ वेळी फेसवॉश करावा.

Skin Care | Saam Tv

त्वचा फ्रेश राहते

तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेला फ्रेश वाटते. चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी याचा वापर करावा

Skin Care Tips

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Skin Care

Uric Acid Symptoms: शरीरात युरिक अॅसिड वाढल्याची सुरुवातीची 7 लक्षणं; याकडे दुर्लक्ष करणं पडेल भारी

Uric Acid Symptoms | Saam Tv
येथे क्लिक करा