Manasvi Choudhary
वज्रासन हा व्यायामाचा प्रकार आहे. वज्रासनात बसल्याने आरोग्याला फायदा होतो. अनेकांना जेवल्यानंतर वज्रासनात बसण्याची सवय असते.
वज्रासनात बसण्याचे आरोग्याला कोणते 5 फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वज्रासनात बसल्यामुळे शरीराचे पोटाच्या भागातील रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे जठर आणि आतड्यांचे कार्य अधिक सक्रिय होते, ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होते.
अनेकांना जेवल्यानंतर अपचन, गॅस, किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. वज्रासनात बसल्यामुळे पोटातील पाचक रसांचा प्रवाह सुरळीत राहतो आणि पित्ताचा त्रास होत नाही.
वज्रासनामुळे पोटावर आणि आतड्यांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि मलोत्सर्जनाची प्रक्रिया सोपी होते.
जेवल्यानंतर वज्रासनात बसल्यानने वजन आणि पोटाची चरबी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
वज्रासनात पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्यामुळे शरीराची मुद्रा सुधारते. या स्थितीत दीर्घ श्वास घेतल्याने मन शांत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.