ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगातील अनेक देशांमध्ये गरिबी अत्यंत गंभीर असून, पोट भरण्यासाठी अनेकांना मजबुरीने रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगात असा देश आहे जिथे भीक मागण्यासाठीदेखील सरकारी परवाना घेणे बंधनकारक आहे. चला, जाणून घेऊया.
जगात एक असा देश आहे जिथे भीक मागायची असेल, तर आधी सरकारकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो. जाणून घ्या ही खास माहिती.
काही वर्षांपूर्वी या देशात नियम करण्यात आला की, भीक मागण्यासाठी भिकाऱ्यांनी आधी परवाना घ्यावा लागेल आणि त्यासाठी शुल्कही भरावे लागेल.
२०१९ मध्ये एस्किलस्टुनामध्ये लागू झालेल्या नियमानुसार, थोडं शुल्क भरल्यावर भिकाऱ्याला परवाना व वैध ओळखपत्र दिलं जातं, मगच भीक मागता येते.
येथे भिकाऱ्यांना ओळखपत्रासह २५० स्वीडिश क्रोना भरावे लागतात. स्थानिक नेत्यांचे मत आहे की, यामुळे भीक मागणे कठीण होईल आणि टळेल.
एस्किलस्टुनाचे प्रशासन सांगते की, परवाना प्रणालीमुळे शहरातील भिकाऱ्यांची संख्या समजते आणि त्यांना आवश्यक मदत व सुविधा देणे अधिक सोपे होते.
परवाना आणि शुल्क प्रक्रियेमुळे भीक मागणे कठीण झाल्याने भिकाऱ्यांची संख्या कमी झाली असून अनेकांनी छोट्या नोकऱ्या वा व्यवसाय सुरू केले आहेत.