SIR 2026: आता घरबसल्या करा स्वत:ची मतदार पडताळणी; ECINET अ‍ॅपवर अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल प्रक्रिया

Sakshi Sunil Jadhav

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला सुरूवात झाली आहे.

ECINET App

महत्त्वाची अपडेट

सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिम या उपाक्रमाअंतर्गत मतदारांना स्वत:ची माहिती ऑनलाइन पद्धतीने तपासण्याची परवानगी देण्यात आली आहे.

voter verification online

SIR 2026 म्हणजे नेमकं काय?

SIR 2026 म्हणजे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण करणे. यामध्ये प्रत्येक मतदाराने स्वतःची माहिती तपासून ती अचूक आहे का हे तपासणं गरजेचं आहे.

voter verification online

प्रक्रियेची सुरुवात

सर्वात आधी मोबाईलमध्ये ECINET अ‍ॅप डाउनलोड करा किंवा Voters.eci.gov.in या वेबसाइटला भेट द्या. दोन्ही माध्यमांतून स्वतःची मतदार माहिती तुम्ही सहज तपासू शकता.

voter verification online

लॉगिन कसे कराल?

मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक वापरून लॉगिन करा. जर खाते नसेल तर नवीन नोंदणी करून प्रक्रिया सुरू करता येते.

voter verification online

SIR-2026 फॉर्म भरा

लॉगिन केल्यानंतर Special Intensive Revision हा ऑप्शन निवडा. यानंतर Self Enumeration फॉर्म व्यवस्थित अचूकपणे भरून घ्या.

voter verification online

वैयक्तिक माहिती तपासा

तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती ही अचूक भरली आहे का? हे खात्रीने तपासा. तिथे तुम्ही माहिती बदलून घेऊ शकता.

voter verification online

आवश्यक माहिती अपलोड करा

सूचनेनुसार आवश्यक असलेली कागपत्र किंवा पत्त्याचा पुरावा अपलोड करा. शेवटी फॉर्म सबमिट करण्याआधी भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा.

voter list verification

OTP किंवा E-Sign द्वारे सबमिट करा

सर्व माहिती भरल्यानंतर OTP किंवा E-Sign च्या मदतीने फॉर्म सबमिट करा. त्यामुळे तुमची माहिती अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडे नोंदवली जाईल.

ECINET voter app

NEXT: सकाळी की रात्री? BP ची गोळी कधी घेतल्याने जास्त फायदा होतो, जाणून घ्या

when to take BP medicine
येथे क्लिक करा