Shreya Maskar
मुंबईत सायन येथे सायन हिलॉक किल्ला आहे. हा किल्ला शिव किल्ला म्हणूनही ओळखला जातो. तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करू शकता.
सायन किल्ला मुंबईतील १७ व्या शतकातील ब्रिटिशांचा एक टेहळणी बुरूज (वॉचटावर) आहे. सायन किल्ला हे मुंबईच्या इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
सायन हिलॉक किल्ला हा बॉम्बेचे गव्हर्नर जेराल्ड ऑन्गियर यांच्या मार्गदर्शनाखाली 'इंग्लीश ईस्ट इंडिया कंपनी'ने बांधला होता. याचे बांधकाम १६६९ ते १६७७ या काळात करण्यात आले.
सायन किल्ला एका उंच टेकडीवर वसलेला असून त्याच्या पायथ्याशी एक उद्यान आहे. हा किल्ला एकेकाळी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या परळ बेटा आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या साल्सेट बेटांमधील जुनी सीमा दर्शवतो.
सायन किल्ल्यावर जुने दगडी अवशेष, वसाहतकालीन टेहळणी बुरूज आणि ऐतिहासिक पाण्याची टाकी यांसारखी महत्त्वाची ऐतिहासिक आकर्षणे आहेत.
मराठे आणि पोर्तुगीज यांसारख्या बाह्य शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आणि माहीम, ठाणे खाडीतून होणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी, लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला एका शंकूच्या आकाराच्या टेकडीवर उभारण्यात आला होता.
सायन किल्ला सायन रेल्वे स्थानकाजवळ आहे. सायन स्टेशनपासून किल्ल्याचे अंतर सुमारे ५०० ते ६४० मीटर आहे. तिथून चालत जाण्यासाठी साधारण ७ मिनिटे लागतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.