Shreya Maskar
सिंहगड किल्ला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखला जायचा. सिंहगड किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातन डोणजे गावाजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.
सिंहगड किल्ला ट्रेकिंगसाठी सर्वात भन्नाट लोकेशन आहे. तुम्ही येथे उन्हाळ्यात मित्रांसोबत वीकेंड प्लान करू शकता.
सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमी नेतृत्वाखाली १६७० रोजी झालेल्या ऐतिहासिक लढाईसाठी प्रसिद्ध आहे. सिंहगड किल्ला जिंकताना सेनापती तानाजी मालुसरे यांनी प्राण गमावले.
तानाजी मालुसरे यांनी मुलाच्या लग्नाआधी मोहिमेवर जाण्यापूर्वी 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे' असे म्हटले होते.
युद्धात मराठ्यांचा विजय झाला, परंतु तानाजींच्या बलिदानामुळे शिवाजी महाराजांनी दुःखी होऊन 'गड आला पण सिंह गेला' असे उद्गार काढले होते.
सिंहगड किल्ल्याव गेलेले पर्यटक पारंपरिक पिठलं-भाकरी, गरमागरम कांदाभजी, माठातील गार दही/ताक आणि ठेचा या अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा मनसोक्त आनंद घेतात.
सिंहगड किल्ला हा १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक, राजाराम महाराजांची समाधी, लोकमान्य टिळकांचे घर, कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.