Manasvi Choudhary
साडीतील सौंदर्य खुलून येण्यासाठी ब्लाऊजचा पॅटर्न महत्वाचा असतो. आज आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट डिझाईन्स पॅटर्न सांगणार आहोत.
ब्लाऊजचे अनेक ट्रेडिंग पॅटर्न आहेत तुम्ही देखील ते नक्की ट्राय करू शकता.
वन स्ट्रिप पट्टी हा अतिशय मॉडर्न पॅटर्न आहे. सिंगल पट्टी असलेला हा ब्लाऊज नेटची साडी किंवा शिफॉन साडीवर उठून दिसतो.
ज्यांना खूप बारीक पट्टी नको आहे, त्यांच्यासाठी ब्रॉड एम्ब्रॉयडरी सिंगल पट्टी हा पॅटर्न आहे. खांद्यावर एकच मध्यम रुंदीची पट्टी असते, ज्यावर जरदोसी, मोती किंवा आरशाचे वर्क केलेले असते.
पैठणी किंवा काठापदराच्या साडीला मॉडर्न लूकसाठी तु्म्ही ब्रॉड एम्ब्रॉयडरी सिंगल पट्टी हा खास पॅटर्न निवडू शकता.
अत्यंत नाजूक आणि स्टायलिश लूकसाठी नूडल स्ट्रॅप ब्लाऊज पॅटर्न आहे. यात खांद्यावर अगदी बारीक दोरी किंवा पट्टी असते. ही पट्टी चकाकणाऱ्या मण्यांची किंवा सोन्याच्या तारेचीही असू शकते.
अॅसिमेट्रिकल कट विथ बॅक बो हा पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे ज्यात पुढच्या बाजूने ब्लाऊजची एकच पट्टी तिरकी जाते आणि मागच्या बाजूला एक मोठा 'बो' किंवा आकर्षक गाठ असते.
ट्रान्सपरंट स्ट्रॅप लूक या पॅटर्नमध्ये पट्टी असते पण ती ट्रान्सपरंट नेटची असते, ज्यावर छोटे खडे किंवा नक्षी असते. लांबून बघितल्यावर ब्लाऊजला पट्टी नाही असे वाटते, पण जवळून ते अतिशय आकर्षक दिसते.