Manasvi Choudhary
पफ स्लीव्ह ब्लाऊजची फॅशन आता ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही देखील पफ स्लीव्ह ब्लाऊजचे हटके स्टाईल निवडू शकता.
पफ स्लीव्ह ब्लाऊज पॅटर्न हे काठपदर, पैठणी आणि ऑर्गन्झा साड्यांवर अत्यंत 'रॉयल' दिसतात.
कोपर-लेंथ क्लासिक पफ हा सर्वात ट्रेंडिग ब्लाऊज पॅटर्न आहे. खांद्यापासून कोपरापर्यंत स्लीव्हज असतात आणि कोपरापाशी मोठा काठ असतो.
ज्यांना खूप मोठे हात आवडत नाहीत, त्यांच्यासाठी छोटी फुगा स्टाईल निवडू शकता. या पॅटर्नमध्ये खांद्यावर थोडे फुगे काढून ४-५ इंचाची स्लीव्ह ठेवली जाते.
तुम्हाला थोडा स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही लेयर्ड पफ स्लीव्ह निवडू शकता. यात फुग्याचे दोन किंवा तीन थर असतात. प्रत्येक थरामध्ये इलास्टिक किंवा पट्टी असते.
पफ विथ फ्रिल्स या पॅटर्नमध्ये खांद्यावर पफ असतो आणि हाताच्या टोकाला नाजूक फ्रिल्स असतात.
बि़शप स्लीव्ह पफ एक मॉडर्न पॅटर्न आहे. खांद्यापासून मनगटापर्यंत पूर्ण हात ढगळ असतात आणि मनगटापाशी घट्ट बटन किंवा पट्टी असते.