Manasvi Choudhary
मराठमोळ्या सौंदर्याचा दागिना म्हणजे नथ. नथ आता केवळ नाकातच नाही तर ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये सुद्धा आहे.
काठपदरी साड्यांवर आकर्षक स्टाईलमध्ये तुम्ही नथीच्या डिझाईन्सने ब्लाऊज पॅटर्न केले जाते.
ब्लाऊजच्या पाठीवर सोन्याच्या जरीने आणि रेशमी धाग्यांनी मोठी नथ विणली जाते. लग्नसमारंभासाठी खास असा पॅटर्न तुम्ही करू शकता.
ब्लाऊजचा मागचा गळा नथीच्या आकारात कापला जातो गळ्याच्या कडेला मोत्यांची माळ लावून नथीचा लूक पूर्ण केला जातो.
पैठणीच्या काठाचा वापर करून नथीचा आकार तयार केला जातो आणि तो ब्लाऊजच्या पाठीवर जोडला जातो. हे डिझाईन अस्सल मराठमोळ्या लूकसाठी परफेक्ट आहे.
मोठी नथ नको असेल, तर ब्लाऊजच्या गळ्याच्या कडेने छोट्या छोट्या नथीची नक्षी मणी आणि कुंदन वापरून काढली जाते.
ऊजच्या पाठीवर नथीच्या आकाराचे सुंदर सोन्याचे किंवा मोत्याचे लटकन लावू शकता हा पॅटर्न अधिक स्टायलिश असेल.