Shreya Maskar
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे सर्जेकोट किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ मध्ये बांधलेला १७ व्या शतकात बांधलेला मुख्य सागरी किल्ला आहे.
सिंधुदुर्ग या अभेद्य किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी आणि वादळ, पावसाळ्याच्या काळात मराठा आरमाराच्या (नौदलाच्या) युद्धनौकांसाठी सुरक्षित स्थान उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्जेकोट किल्ला बांधला.
सर्जेकोट किल्ल्याच्या सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन कुडाळ हे आहे. हे स्टेशन किल्ल्यापासून सुमारे ३२.८ किमी अंतरावर असून, कुडाळ-मालवण मार्गाने गाडीने तिथे पोहोचण्यास साधारण १ तास लागतो.
सर्जेकोट किल्ला त्याच्या जाड दगडी भिंती, बुरूज आणि कोळंब खाडीतील नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित अशा नौका-थांब्यासाठी प्रसिद्ध आहे. मालवण परिसरातील अभेद्य सिंधुदुर्ग किल्ल्याभोवती असलेल्या संरक्षक तटबंदीच्या साखळीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता.
मराठा लष्करी वास्तुकला आणि कोकण किनारपट्टीचे खडकाळ सौंदर्याचा नजारा पाहायला मिळतो. मालवणमधील कोळंब खाडीच्या मुखाशी वसलेला हा किल्ल्यावरून पर्यटकांना अरबी समुद्राचे शांत दृश्य, डोलणारी नारळाची झाडे आणि सूर्यास्ताची विलोभनीय दृश्ये पाहायला मिळतात.
सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात उभारलेला एक सागरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील मालवण किनारपट्टीजवळील अरबी समुद्रातील 'कुर्ते' बेटावर हा किल्ला वसलेला आहे.
आपल्या ३० फूट उंच भव्य तटबंदी, लपवलेले प्रवेशद्वार यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.