Ruchika Jadhav
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गाला सिंधुदुर्ग असं म्हणतात.
किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्हाला दादर ते कुडाळ अशी ट्रेन पकडावी लागेल. दिवसातून ४ वेळा ही ट्रेन धावते.
येथे प्रवास करताना तुम्हाला ६,००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. या प्रवासाला १४ तास ३९ मिनिटे इतका वेळ लागतो.
या किल्ल्याची खासीयत अशी आहे की येथे गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी या विहिरींची नावे आहेत.
किल्ल्यावर उभे राहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण गाव पाहता येते.
दर वर्षी या किल्ल्यावर लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.
इतिहासाची माहिती आणि आठवण करून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांसह स्वत: या किल्ल्याला भेट देऊ शकता.