Malvan Tourism: येवा, मालवण आपलोच असा! पावसाळ्यात मालवणातील 'या' Hidden जागा नक्की फिरा

Surabhi Jayashree Jagdish

मालवण

मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर किनारपट्टी शहर, पावसाळ्यात अधिकच नयनरम्य आणि हिरवेगार होतं.

पावसाळ्यातील अनुभव

या काळात वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग सारखे काही पर्याय बंद असले तरी, निसर्गाची हिरवळ, धुके आणि शांतता अनुभवण्यासाठी पावसाळा हा एक वेगळाच अनुभव देतो.

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा भव्य जलदुर्ग अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. पावसाळ्यात समुद्रातील लाटा किल्ल्याच्या तटबंदीवर आदळताना पाहणे हा एक रोमांचक अनुभव असतो.

रॉक गार्डन

चिवला बीचजवळ असलेला हा सुंदर बगीचा खडकाळ किनाऱ्यावर बांधलेला आहे. पावसाळ्यात या ठिकाणची हिरवळ अधिकच खुलून दिसते.

चिवला बीच

तारकर्ली बीचच्या तुलनेत हा कमी गर्दीचा आणि शांत बीच आहे. पावसाळ्यात याठिकाणची पांढरी शुभ्र वाळू आणि हिरवीगार झाडी अधिकच सुंदर दिसते. लाटांचा आवाज ऐकत, पाऊस अनुभवत शांतपणे वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

कांदळवन

मालवणच्या आसपासच्या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनाची झाडी आहे. पावसाळ्यात ही झाडी अधिक हिरवीगार आणि छान दिसतात.

देवबाग संगम

कर्ली नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तो हा संगम पॉईंट. पावसाळ्यात नदी आणि समुद्राच्या पाण्याचा मिलनाचे दृश्य खूप आकर्षक दिसते. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला असतो.

सुरक्षा

पावसाळ्यात समुद्रात जाऊ नका. कारण पावसाळ्यात लाटा खूप मोठ्या असतात आणि समुद्रात उतरणे धोकादायक असू शकते.

Dhule Tourism: पावसाळ्यात गर्दी नसलेल्या शांत ठिकाणी फिरायचंय? धुळ्यातील या ५ Hidden जागांना नक्की भेट द्या

hidden places in Dhule | saam tv
येथे क्लिक करा