ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आल्याचा वापर अनेक भारतीय पदार्थांमध्ये केला जोते. कोणत्याही पदार्थामध्ये किंवा चहामध्ये आलं घातल्यामुळे त्याची चव अधीक वाढते.
पावसाळा सुरु होताच घरामधील अनेक पदार्थ खराब होऊ लागतात. त्यापैकी एक म्हणजे आलं.
आल्यामध्ये अनेक दाहक विरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.
घरामधील आलं जास्त टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
आलं स्वच्छ धुवा यामुळे त्यावर असलेली माती किंवा धूळ निघून जाते. आलं सुती कपड्यामध्ये ठेवल्यामुळे जास्त दिवस टिकतं.
जास्त दिवस आलं टिकवून ठेवण्यासाठी आल्याची पेस्ट बनवा. पेस्टमध्ये पाणी टाकू नये.
आलं कडक उन्हात सुकवून घ्या त्यामुळे ते लवकर खराब होणार नाही आणि तुम्ही त्याची पावडर देखील बनवू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.