ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोड पदार्थ खायला लहानांपासूनच मोठ्यापर्यंत सर्वांनाच असते. मात्र नियमितपणे गोड खाल्याने आरोग्यासाठी घातक आहे.
अनेकदा ही गोड खाण्याची इच्छा दिवसेंदिवस वाढत जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला गोड खाणे कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
प्रथिने, गुड फॅट आणि फायबर असलेले संतुलित पदार्थ खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते.
दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.
ज्यावेळेस तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा होते तेव्हा काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स, फळे हे पदार्थ खा.
कमी झोपेमुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते त्यामुळे पुरेशी झोप घ्या. नीट झोप झाल्याने आरोग्यासाठी फायद्याचे असते.
तणावात असल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. तणावामुळे शुगर क्रेव्हिंग कमी होऊ शकते. अनेकदा जेवण वेळेत न केल्याने देखील गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.