Todays Horoscope: 'या' राशींसाठी सोप्या गोष्टी अवघड होऊ शकतात, पाहा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

धावपळ , दगदग आज दिवसभरात वाढणार आहे. मात्र काहीतरी वेगळा पराक्रम आज कराल.

वृषभ

धनयोग उत्तम आहेत. वारसा हक्काच्या प्रॉपर्टीशी निगडित काही व्यवहार किंवा बैठका असतील तर आज त्या पार पडतील.

मिथुन

वक्तृत्व उत्तम असणारी आपली रास आहे. बोलण्यामधून समोरच्याचे मन जिंकाल अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य करण्यासाठी धडपड करावी लागेल.

कर्क

मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील. सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. अध्यात्मिक कास धरल्यास दिवस बरा राहील.

सिंह

मैत्री मधून लाभ संभावत आहेत. धडपड करून मिळालेले यश हे कायमस्वरूपी असते हे जाणवेल.

कन्या

समाजकारणामध्ये हिरीरिने सहभाग घ्याल. हिशोबाशी निगडित काही गोष्टी असतील तर असत्या मार्गी लागतील.

तुळ

देवी उपासना फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्री भेटी होतील.

वृश्चिक

गुप्तधनाची आस वाढेल. कदाचित त्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

धनु

व्यवसायामध्ये अनेक टप्पे आज चांगले येतील. नव्या सृजनशील गोष्टींमध्ये सहभाग घ्यायला हरकत नाही.

मकर

जुने, चिकट रोग- आजार आज डोके वर काढतील. कामात येणाऱ्या अडचणी बोलून सोडवल्यानंतर सहज मार्ग निघेल.

कुंभ

संशोधनात्मक वृत्ती वाढीस लागेल. नव्याने काहीतरी शिकण्यासाठी धडपड करायला विद्यार्थ्यांना दिवस उत्तम आहे.

मीन

घरी एखादे धार्मिक कार्य होईल. नव्याने काही खरेदी करायचे असेल तर आज आवश्य करावी.

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

येथे क्लिक करा