Dhoti Style Saree : सिंपल रेशमी साडी धोती स्टाइलमध्ये नेसा, तुमच्या स्टायलिश लूकचे लोक दिवाने होतील

Shreya Maskar

धोती साडी

धोती स्टाइल साडी नेसण्यासाठी, तुम्ही आधी लेगिंग्ज किंवा घट्ट पायजमा घाला. लक्षात ठेवा की, या प्रकारच्या साडीखाली पेटीकोट घातला जात नाही.

Dhoti Saree | pinterest

साडी नेसा

साडी गोळा करून कमरेच्या दिशेने नेसावी. समोर एक गाठ मारावी. तुमच्या डाव्या बाजूलाही साडीचा काही भाग असावा.

Draping the Saree | pinterest

पदर

डाव्या बाजूच्या साडीच्या पदराला चुण्या घालून तो पुढून मागे पायांखालून आणावा आणि कमरेच्या मागच्या बाजूला खोचून पदर तयार कराव

Pallu | pinterest

धोती स्टाइल चुण्या

आता उजव्या बाजूचे पदर घ्या आणि त्याचप्रकारे ते पायांच्या मधून मागे आणावे. साडी समोरच्या बाजूला खेचून दोन किंवा तीन लहान चुण्या तयार करा आणि त्याच डाव्या बाजूच्या कमरेभोवती नेसावा. पदराच्या चुण्या घालून तो विरुद्ध हातावर घ्या.

Dhoti-Style Pleats | pinterest

पदर पिन करा

प्रथम साडीची वरची किनार किंवा काठ पकडून कमरेपासून मागे खेचावा. पदराखाली पिन लावून तो सुरक्षित करावा.

Pin the Pallu | pinterest

सिंपल ट्रिक

साडी उजव्या बाजूला पायांच्या मधून मागे घ्या आणि मग पदर डाव्या बाजूला घ्या. साडीला सुंदर धोती स्टाइल लूक येईल.

Simple Trick | pinterest

ब्लाउज डिझाइन

धोती-शैलीच्या साडीवर असा ब्लाउज आवश्यक असतो, जो साडीचा आकार आणि घेर यांचा समतोल साधेल. कॉर्सेट-शैली, पेप्लम, केप-स्लीव्ह किंवा डीप-व्ही क्रॉप टॉप्ससारखे आधुनिक, फ्यूजन-शैलीचे पर्याय या धोतीसोबत खूप सुंदर दिसतात.

Blouse Design | pinterest

साडी कशी स्टाइल करावी?

सुंदर कंबरपट्टा, एखादा सुबक आधुनिक बेल्ट आणि नक्षीकाम केलेले जॅकेट वापरून या लूकची शोभा वाढवू शकता. ठसठशीत झुमके आणि 'जुत्ती' घालून हा पेहराव पूर्ण करा. मराठमोळा टच देण्यासाठी नाकात नथ आणि चंद्रकोर टिकली लावा.

How to Style the Saree? | pinterest

NEXT : 'रेट्रो' लूकचा तडका! पोल्का डॉट्स साडी फॅशनचा ट्रेंड, पाहा ५ सुंदर डिझाइन्स

Polka Dot Saree Design | pinterest
येथे क्लिक करा...