Shreya Maskar
पोल्का डॉट साड्या त्यांच्या काळील रेट्रो लूक आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, ज्यात नॉस्टॅल्जिक आकर्षण आणि आधुनिकतेचा टच पाहायला मिळतो.
लहान, नाजूक पोल्का डॉट्सपासून ते मोठे, ठळक किंवा रंगीबेरंगी ठिपक्यांपर्यंत विविध आकारांचे ठिपके साडी किंवा ब्लाउजवर आढळतात. याची रंगसंगती कमाल असते.
पोल्का डॉट साड्या कॉटन, जॉर्जेट, ऑर्गन्झा मलमल, आणि क्रेपसारख्या हलक्या वजनाच्या, हवेशीर कापडात लोकप्रिय आहेत, ज्यामुळे त्या कॅज्युअल, सणासुदीच्या आणि बॉलीवूड-प्रेरित लूकसाठी आदर्श ठरतात.
यात पांढऱ्या ठिपक्यांसह काळी, लाल किंवा निळ्या रंगाची साडी खूप सुंदर दिसतात. आधुनिक फॅशनमध्ये पेस्टल रंग, ग्रे, आणि क्रीम रंगाच्या साड्यांवर काळे किंवा पांढरे ठिपके खूप सुंदर दिसतात.
पोल्का डॉट साडीवर कंट्रास्ट रंगाचे, solid रंगाचे, स्ट्राइप्स पॅटर्नचे ब्लाउज खूप छान दिसतात. स्टायलिश लूकसाठी स्लीव्हलेस , बोट नेक किंवा क्रॉप टॉप स्टाईलचे ब्लाउज उत्तम पर्याय आहेत, जे रेट्रो आणि मॉडर्न लूक दोन्ही देतात.
पोल्का डॉट साड्या कधीच फॅशनच्या बाहेर जात नाहीत. या साड्या कॅज्युअल आउटिंग, ऑफिस मीटिंग, लंच डेट्स, किंवा संध्याकाळच्या पार्टीसाठी उत्तम पर्याय आहेत.
पोल्का डॉट साडी खरेदी करताना फॅब्रिक, ठिपक्यांचा आकार आणि रंग यावर लक्ष देणे आवश्यक आहे. साडी साधी असेल तर डिझायनर किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज खरेदी करा.
पोल्का डॉट साडीसोबत मिनिमल ज्वेलरी वापरा. चोकर किंवा मोठे कानातले घालून तुम्ही लूक परिपूर्ण करू शकता. मेकअप देखील हलका करा.