Saam Tv
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोनर हा सगळ्यात सोप्पा मार्ग आहे.
बाजारातून टोनर विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी सोप्प्या पद्धतीने तुम्ही टोनर तयार करु शकता.
बासमती तांदूळ ,पाणी, स्प्रे बाटली इ.
सर्वप्रथम तुम्ही बासमती तांदूळ एका भांड्यात घेऊन स्वच्छ धुवा.
तांदूळ धुताना अनेक वेळा पाणी बदला, जेणेकरून तांदूळात असलेला स्टार्च निघून जाईल.
धुतलेले तांदूळ एका भांड्यात ठेवा आणि त्यात पुरेसे पाणी ठेवून अर्धा तास भिजत ठेवा.
त्यानंतर भिजवलेले तांदूळ गाळून ते पाणी स्वच्छ स्प्रेच्या बाटलीत भरा. ती बाटली थंड जागी थोडावेळ ठेवा.
आता तुमचे सगळ्यात सोप्पे टोनर तुम्ही सकाळी उठल्यावर लावू शकता.
NEXT : दिशाच्या दिलखेच अदा; पाहा