Shruti Vilas Kadam
तुमच्या नावावर किती मोबाइल कनेक्शन सुरू आहेत, हे ‘Sanchar Saathi’च्या माध्यमातून सहज तपासता येते.
24 ऑगस्ट 2026 पासून एखाद्या व्यक्तीच्या नावावर आधीच 9 मोबाइल कनेक्शन असल्यास नवीन नंबर जारी केला जाणार नाही.
मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर Sanchar Saathi वेबसाइटवर जाऊन ‘Know Mobile Connections in Your Name’ हा पर्याय निवडा.
आपला मोबाइल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर OTPच्या माध्यमातून ओळख पडताळणी पूर्ण करावी लागेल.
व्हेरिफिकेशननंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाइल कनेक्शनची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही कधीही वापरला नसलेला नंबर आढळल्यास ‘This is not my number’ किंवा ‘Not required’ पर्याय निवडून Report करता येईल. त्यानंतर संबंधित कंपनी तपासणी करून नंबर बंद करण्याची प्रक्रिया करेल.
मोबाइल नंबर बँकिंग, UPI, OTP आणि सोशल मीडिया यांसारख्या सेवांशी जोडलेला असतो. त्यामुळे तुमच्या नावावर अनोळखी SIM असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.