Shruti Vilas Kadam
ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दोघांचा आगामी ‘शुभमंगल जोडी दंगलम’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने ललित आणि प्राजक्ता पुन्हा एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
१३ वर्षांपूर्वी आलेल्या जुळून येती रेशमीगाठी या मालिकेतून या जोडीने प्रेक्षकांवर भुरळ घातली.
या मालिकेत या दोघांनी आदित्य आणि मेघना हे पात्र साकारले होते. प्रेक्षकांना आजही त्यांंच हे पात्र मालिका आणि शीर्षक गीत फार आवडतं
दोघांनी केलेल्या रोमँटिक फोटोशूटमधील खास अंदाजाने सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे.
फोटोशूटमध्ये ललित आणि प्राजक्ताची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 13 वर्षांनी पुन्हा एकत्र येणारी ही जोडी चाहत्यांसाठी नक्कीच खास ठरणार असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.