Mumbai Beach : थंडगार वारा अन् अथांग समुद्रकिनारा, मुंबईच्या गर्दीत लपलेला 'हा' बीच ९९% लोकांना माहितच नसेल, वीकेंड करा प्लान

Shreya Maskar

मुंबई हिडन बीच

सिल्व्हर बीच हा मुंबईतील जुहू परिसरात वसलेला आहे. तो जुहूच्या मुख्य समुद्रकिनाऱ्याचा तुलनेने शांत भाग मानला जातो. येथे समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी आणि रोजच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळवण्यासाठी लोक येतात.

Mumbai Hidden Beach | google

सिल्व्हर बीच

सिल्व्हर बीचचे प्रमुख आकर्षण म्हणजे समुद्राचे दृश्य, वाळूचा किनारा आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा होय. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Silver Beach | google

योग्य वेळ

सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास भेट देणे चांगले ठरू शकते. दुपारच्या तुलनेत या वेळेत वातावरण अधिक आल्हाददायक असते. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असू शकतो.

right time | google

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले किंवा अंधेरी रेल्वे स्टेशनला उतरून पुढे रिक्षा किंवा टॅक्सीने जुहूतील सिल्व्हर बीच परिसरात जाता येते.

How to reach | google

सिल्व्हर बीच बेस्ट का?

मुंबईच्या धावपळीच्या जीवनात समुद्रकिनारी काही वेळ शांतपणे घालवायचा असेल, तर जुहूचा सिल्व्हर बीच हा उत्तम पर्याय आहे.सूर्यास्त पाहणे, समुद्रकिनारी चालणे आणि मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यासाठी येथे भेट देता येते.

Why Silver Beach Best? | google

समुद्राच्या लाटा

किनाऱ्यावर बसून किंवा फेरफटका मारून समुद्राचा आनंद घेता येतो. संध्याकाळच्या वेळी अरबी समुद्रावरील सूर्यास्त पाहता येतो.

The waves of the sea | google

थंड वातावरण

समुद्राची हवा आणि लाटांचा आवाज यामुळे निवांत वेळ घालवता येतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात थंड वातावरण येथे अनुभवता येते.

Cold weather | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : स्वच्छ आकाश, थंडगार हवा अन् मनमोहक सूर्यास्त; नोव्हेंबरमध्ये आवर्जून भेट द्या 'या' सुंदर हिल स्टेशनला

Hill Station | AI PHOTO
येथे क्लिक करा...