Hill Station : स्वच्छ आकाश, थंडगार हवा अन् मनमोहक सूर्यास्त; नोव्हेंबरमध्ये आवर्जून भेट द्या 'या' सुंदर हिल स्टेशनला

Shreya Maskar

हिल स्टेशन

कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या कुशीत अगुंबे हिल स्टेशन वसलेले आहे. हिरवीगार जंगले, धुक्याने झाकलेले डोंगर, मुसळधार पाऊस, नयनरम्य धबधबे आणि अप्रतिम सूर्यास्त यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Hill station | google

अगुंबे हिल स्टेशन

अगुंबे हे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी तालुक्यात वसलेले एक छोटे गाव आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ६४० मीटर उंचीवर असलेल्या अगुंबेला अनेकदा दक्षिण भारताचे चेरापुंजी असेही म्हटले जाते, कारण येथे भरपूर पाऊस पडतो.

Agumbe Hill Station | google

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा अगुंबेला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. उडुपी किंवा शिवमोग्गा स्टेशनला उतरून पुढे बस किंवा टॅक्सीने प्रवास करता येतो.

Best time to visit | google

राहण्याची सोय

अगुंबे गावात होमस्टे आणि मर्यादित निवासव्यवस्था उपलब्ध आहे. अधिक पर्यायांसाठी तीर्थहळ्ळी परिसरात राहण्याचा विचार करता येतो.

Accomodation | google

अगुंबे सनसेट पॉइंट

अगुंबे सनसेट पॉइंट येथून पश्चिम घाटाच्या डोंगररांगा आणि स्वच्छ हवामानात दूरवरचा समुद्राकडील क्षितिजभाग पाहता येतो. सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण विशेष सुंदर दिसते.

Agumbe Sunset Point | google

बर्काना धबधबा

बर्काना धबधबा सुमारे २६० मीटर उंचीवरून कोसळणारा हा भव्य धबधबा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. येथे जाण्यासाठी काही मार्गांवर वनविभागाची परवानगी आणि स्थानिक मार्गदर्शक आवश्यक असू शकतात.

Berkana Falls | google

ओनाके अब्बी धबधबा

जंगलातील पायवाटांमधून पोहोचता येणारा हा धबधबा ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात पायवाटा निसरड्या होऊ शकतात.

Onake Abbey Waterfall | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : थंडी सुरू होण्याआधी करा ट्रिप प्लान, नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी भारतातील ५ सुंदर ठिकाणं

November Travel | AI PHOTO
येथे क्लिक करा...