Manasvi Choudhary
सिल्क साडी ही प्रत्येक महिलांच्या आवडीची साडी आहे. सिल्क साडी कोणत्याही महिलेवर उठून दिसते.
सिल्क साडीवर पारंपारिक नक्षी आणि आधुनिक 'कट्स' असे ब्लाऊज पॅटर्न शोभून दिसतात.
एल्बो लेंथ' बाह्या विथ मॅगम वर्क हा ब्लाऊज पॅटर्न सिल्क साडीवर शोभून दिसतो. कोपरापर्यंत बाह्या ठेवून त्यावर जरदोजी, मणी किंवा कुंदनचा वापर करून मोराची, कलशाची किंवा फुलांची नक्षी काम करा.
साध्या पाठीच्या गळ्यापेक्षा 'कट-वर्क' सध्या खूप ट्रेडिंग आहे. पाठीच्या गळ्याच्या कडेने लेझर कटिंग किंवा हाताने एम्ब्रॉयडरी करून कापडाचा काही भाग काढला जातो, ज्यामुळे एक सुंदर 'जाळीदार' नक्षी तयार होते.
फॅशनेबल आणि प्रोफेशनल लूकसाठी 'पिटर पॅन' किंवा हाय नेक कॉलर ब्लाऊज भारी आहे.
पफ स्लीव्हज विथ बॉर्डर जुन्या काळातील 'फुग्याच्या बाह्या' आता पुन्हा एकदा फॅशनमध्ये आल्या आहेत.
आता साडीच्या रंगाचाच ब्लाऊज शिवण्यापेक्षा 'कॉन्ट्रास्ट' कापड वापरण्याकडे कल वाढला आहे.