Silent Heart Attack: महिलांना सतत थकवा, पाठ-खांदेदुखी जाणवतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतात सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं

Shruti Vilas Kadam

सतत थकवा जाणवणे

नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे किंवा कोणतेही विशेष काम न करता अचानक अशक्त वाटणे हे काही महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत असू शकतात.

Heart Attack Symptoms in Women | PINTREST

श्वास घेण्यास त्रास होणे

छातीत तीव्र वेदना नसतानाही अचानक धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे महत्त्वाचे लक्षण ठरू शकते.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

मळमळ किंवा उलटी होणे

काही महिलांना हार्ट अटॅकदरम्यान मळमळ, उलटी किंवा पोट बिघडल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे अशा लक्षणांकडे केवळ पचनाच्या समस्येप्रमाणे पाहू नये.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

पाठ, खांदा किंवा जबड्यात वेदना

छातीत वेदना नसतानाही पाठ, खांदा, मान किंवा जबड्यात अचानक दुखणे किंवा दाब जाणवणे हे हृदयविकाराशी संबंधित असू शकते.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

चक्कर येणे किंवा अशक्तपणा

अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा खूप अशक्त वाटणे अशी लक्षणेही काही महिलांमध्ये दिसू शकतात.

symptoms of heart attack | Canva

थंड घाम येणे

विशेष कारण नसताना अचानक थंड घाम फुटणे, बेचैनी किंवा अस्वस्थ वाटणे हे संभाव्य चेतावणीचे लक्षण असू शकते.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

छातीत दाब किंवा अस्वस्थता

‘सायलेंट’ हार्ट अटॅकमध्ये नेहमी तीव्र छातीत दुखणे असेलच असे नाही. छातीत दाब, जडपणा किंवा किरकोळ अस्वस्थता देखील जाणवू शकते.

symptoms of heart attack | Canva

महत्त्वाची टीप

‘सायलेंट हार्ट अटॅक’मध्ये लक्षणे सौम्य किंवा अस्पष्ट असू शकतात आणि काही वेळा लक्षणे जाणवतही नाहीत. अचानक श्वास घेण्यास त्रास, छातीत दाब/वेदना, बेशुद्धी किंवा तीव्र अस्वस्थता जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Heart attack symptoms | saam tv

Teeth Whitening Home Remedies: हसताना दातांचा पिवळेपणा दिसतोय? आजच करून पाहा 'हा' सोपा घरगुती उपाय

Teeth Whitening Home Remedies
येथे क्लिक करा