Teeth Whitening Home Remedies: हसताना दातांचा पिवळेपणा दिसतोय? आजच करून पाहा 'हा' सोपा घरगुती उपाय

Shruti Vilas Kadam

दातांचा पिवळसरपणा का दिसतो?

दिवसातून दोनदा ब्रश करूनही काही लोकांच्या दातांवर पिवळसर थर दिसतो. अशावेळी दातांची योग्य स्वच्छता आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Home Remedies For Teeth

घरगुती उपायासाठी लागणारे साहित्य

या उपायासाठी साधारण अर्धा लिटर पिण्याचे पाणी, दोन छोटे तुरटीचे खडे आणि १२ ते १५ लवंगा लागतात.

Home Remedies For Teeth

पाणी तयार करण्याची पद्धत

एका स्वच्छ काचेच्या बाटलीत पाणी घेऊन त्यात तुरटीचे खडे आणि लवंगा टाका. बाटली बंद करून हे मिश्रण साधारण एक दिवस ठेवावे.

Home Remedies For Teeth

लवंगाचा अर्क पाण्यात उतरतो

साधारण २४ तासांनंतर तुरटी विरघळते आणि लवंगाचा अर्क पाण्यात उतरतो. त्यानंतर हे पाणी गुळण्या करण्यासाठी वापरले जाते.

Teeth Whitening Home Remedies | Saam TV

गुळण्या कशा करायच्या?

रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्यानंतर हे तयार केलेले पाणी तोंडात घ्या. सुमारे ३० सेकंद ते तोंडात फिरवून नंतर थुंकून टाका.

Teeth Whitening Home Remedies | Yandex

नियमित वापराबाबत दावा

संबंधित लेखानुसार, हा उपाय काही दिवस नियमित केल्याने दातांवरील पिवळसरपणा कमी होऊन चमक येण्यास मदत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

Home Remedies | Saam Tv

दातांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

दातांवर घट्ट थर, वेदना, हिरड्यांतून रक्त येणे किंवा सतत पिवळेपणा असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता दंतवैद्यांचा सल्ला घेणे योग्य आहे.

Teeth Care | Yandex

Ajwain Water Benefits: रोज सकाळी ओव्याचं कोमट पाणी प्या; गॅस, ब्लोटिंग, वजन कमी होण्यासह मिळतील 'हे' ७ फायदे

Ajwain Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा