Manasvi Choudhary
नाताळ या सणाला ख्रिसमस ट्रीला विशेष महत्व आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीपासून ख्रिसमस ट्रीला विशेष महत्व आहे.
याचवेळेस इजिप्त आणि रोम शहरांमध्ये घरात ख्रिसमस ट्री ठेवणे शुभ मानले जात होते.
रोम शहरात ख्रिसमस ट्री घर सजवण्यासाठी वापरले जात होते.
ख्रिसमस ट्री सजवण्याची सुरूवात जर्मनीमध्ये 15 व्या शतकात सुरू झाली.
ख्रिस्ती धर्माचे मार्टिन ल्यूथर यांनी सर्वप्रथम ख्रिसमस ट्री ला घरी आणून सजवले तेव्हापासून ही पद्धत सुरू झाली.
मार्टिन ल्यूथर 24 डिसेंबरच्या संध्याकाळी बर्फाच्छदित परिसरात फिरत होते. तेथे त्यांना सदाहरित वृक्ष दिसले.
चंद्राच्या प्रकाशाने या झाडाच्या फांद्या चमकत होत्या हे सौंदर्य पाहून मार्टिन ल्यूथर यांनी हे झाड घरी आणले.
यावेळी येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानमित्त हे झाड सजवण्यात आले होते.