Shraddha Thik
टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज वाढदिवस. त्याचा जन्म 12 डिसेंबर 1980 मध्ये मुंबईत झाला.
सिद्धार्थ शुक्ला या जगात नसला तरी त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात तो आजही जिवंत आहे.
सिद्धार्थने त्याच्या अभिनय आणि स्वभावामुळे इंडस्ट्रीसह चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले.
सिद्धार्थने 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छोटे ना' मधून करिअरची सुरुवात केली, पण त्याला खरी ओळख मिळाली ती 'बिग बॉस' या शोमधून.
सिद्धार्थने इंटिरियर डिझायनिंगची नोकरी सोडून मॉडेलिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
सिद्धार्थ शुक्लाने अनेक फॅशन शोमध्ये भाग घेतला होता.आणि जिंकलेही होते. तसेच त्याने 2005 मध्ये तुर्कीमध्ये वर्ल्ड बेस्ट मॉडेलचा किताब जिंकला होता.
सिद्धार्थ 'ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी', 'बालिका वधू', 'झलक दिखला जा', 'खतरों के खिलाडी' सारख्या शोमध्ये दिसला होता आणि 'बिग बॉस 13' चा विजेताही बनला होता.
सिद्धार्थने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातही काम केले होते, 2 सप्टेंबर 2021 रोजी त्याला वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने या जगाचा निरोप घेतला.