Shruti Vilas Kadam
हेअर डाईमधील केमिकल्समुळे केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि केस तुटण्याची समस्या वाढते.
वारंवार डाई केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.
काही लोकांना हेअर डाईमुळे खाज, लालसरपणा, सूज किंवा जळजळ होऊ शकते.
एकदा केमिकल डाई वापरल्यावर केसांचा मूळ रंग बदलतो आणि पुन्हा नैसर्गिक रंग मिळवणे कठीण जाते.
डाईमधील घटकांमुळे स्काल्प कोरडा होतो आणि कधी कधी जखमा होण्याची शक्यता असते.
हेअर डाईतील तीव्र वासामुळे डोकेदुखी, मळमळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
काही केमिकल्स दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.