Siddhi Hande
दिवसभरात ७-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहते.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक घाईमध्ये उभे राहून पाणी पितात. यामुळे शरीराचे नुकसान होते.
उभे राहून पाणी प्यायल्याने पचनाशीसंबंधित आजार होतात.
उभे राहून पाणी प्यायल्यावर किडनीवर परिणाम होतो. किडनीवर ताण येतो त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीच्या समस्या होतात. हात- पाय खूप जास्त दुखतात.
नेहमी बसून पाणी प्यावे. बसून पाणी प्यायल्याने आजार होत नाही. शरीर तंदुरुस्त राहते.